
Water Detector आपण मानवासाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तसेच शेतीसाठी देखील पाणी आवश्यक घटक आहे. पाण्याचा मुबलक स्त्रोत उपलब्ध असल्याशिवाय आपल्याला शेती करता येत नाही. म्हणूणच मुख्यत्वे शेतामध्ये विहिरी आणि बोअरवेल खोदले जातात. परंतु बोअरवेलच्या बाबतीत जर विचार केला तर बऱ्याचदा जमिनीतील पाण्याची पातळी व्यवस्थित लक्षात न आल्यामुळे बोअरवेल चे खोदकाम वाया जाते. अशावेळी बोअरवेल खोदूनही त्याला पाणी लागले नाही तर शेतकऱ्यांचे खूप जास्त आर्थिक नुकसान होत असते.
शेतीसाठी पाणी हवे या आशेने बोअरवेलचे खोदकाम करुन घेणाऱ्या शेतकऱ्यांना असा अनुभव येतो की अगदी कधी कधी 100 फुटांवर पाणी लागते तर कधी कधी 1000 फूट खोल खोदून देखील बोअरवेलला पाणी लागत नाही. यावेळी शेतकरी हताश होतात, त्यांचा खर्च वाया गेलेला असतो त्यामुळे बरेच शेतकरी नाराज होतात. जर आपण जमिनीमधील पाण्याचा शोध घेणाऱ्या काही पारंपरिक आणि नवतंत्रज्ञानयुक्त अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला तर हे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येते.
जमिनीखाली असलेल्या पाण्याच्या साठ्याचा अंदाज घेण्यासाठीच्या पारंपरिक पद्धती
भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे संपूर्ण भारतात पाण्याची पातळी शोधण्यासाठी पारंपारिक पद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
नारळ हातात घेऊन पाणीसाठा शोधणे
अनेक वर्षांपासून आपल्या भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात देखील जमिनीखालील पाण्याची पातळी आणि पाण्याचा साठा शोधण्यासाठी वापरात येणारी पारंपरिक पद्धत म्हणजे नारळ हातात घेऊन पाण्याचा शोध घेणे. यामध्ये नारळ हातात घेऊन संबंधित व्यक्ती शेतामध्ये फिरतात आणि ज्या ठिकाणी नारळ हातावर उभा राहिल त्या ठिकाणी पाणी आहे असा अंदाज बांधला जातो. ही पद्धत शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्ह पद्धत मानली जाते आणि या पद्धतीने शोधलेल्या जागेत मोठा पाणी साठी असतो असे बरेचदा सिद्ध झालेले आहे.
लिंबाच्या झाड्या फांदीचा वापर करुन पाणी शोधणे
जमिनीखालील पाणीसाठी शोधण्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये लिंबाच्या झाडाच्या फांदीचा वापर केला जातो. ही लिंबाच्या झाडाची काठी Y आकाराची असावी. त्याची वरील दोन्ही टोकं हातात पकडल्याने खालील बाजू मध्यभागी येईल. अशाच पद्धतीने संपूर्ण शेतात फिरावे जिथे पाणी असेल त्या ठिकाणी खालील निमुळता भाग म्हणजेच Y आकाराच्या काठीचा खालचा भाग हा आपल्याआपण हलू लागतो आणि वरील दोन टोके पकडलेल्या व्यक्तीला समजते की या ठिकाणी पाणी आहे.
Water Detector जमिनीखालील पाण्याचा शोध घेण्यासाठी आधुनीक शास्त्रीय पद्धती
जमिनीखालील पाण्याच्या साठ्याचा शोध लावण्याच्या अनेक पद्धतींपैक एक महत्त्वाची पद्धत म्हणजे विद्युत प्रतिरोधक सिद्धांत ही पद्धत. ही पद्धत विद्युत वाहकतेच्या नियमावर आधारित आहे. या पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या साधनाला ‘इलेक्ट्रिक रेझिस्टिव्हिटी’ असे नाव देण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक रेझिस्टिव्हिटी या पद्धतीमध्ये संबंधित उपकरणाचे तार किंवा इलेक्ट्रोड आठ ते दहा इंच खोल जमिनीमध्ये गाडून ठेवले जातात. तार किंवा इलेक्ट्रोडच्या माध्यमातून विद्युत प्रवाह जमिनीमध्ये सोडला जातो व जमिनीखालील पाण्याची पातळी तपासली जाते. याबद्दल तज्ञ सांगतात की विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून जे काही यंत्र असते त्याच्यावर रीडिंग येते व त्या रीडिंग वरून जमिनीखालील पाण्याच्या पातळीचा अचूक अंदाज मिळू शकतो. या माध्यमातून कोणत्याही ठिकाणी पाणी आहे किंवा नाही याची विश्वासार्ह माहिती मिळते.
या पद्धतीने मिळालेली माहिती घेतली जाते व सॉफ्टवेअरच्या मदतीने संपूर्ण विश्लेषण केले जाते. तसेच दुसरी शास्त्रीय पद्धती बद्दल बोलताना तज्ञ सांगतात की रेजिस्टिव्हिटी इमेजिंग सिस्टीम एक वैज्ञानिक पद्धत असून या पद्धतीमध्ये जमिनीतील पाण्याचा अंदाज घेण्यासाठी सुधारित उपकरणाचे बारा किंवा 24 इलेक्ट्रॉन जमिनीमध्ये गाडले जातात व त्यांच्या मदतीने जमिनीची व जमिनीमधील जे काही अंतर्गत घटक आहेत त्याच्या प्रतिमा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घेतल्या जातात. एक ते दीड तासांमध्ये ही सगळी माहिती शेतकऱ्यांना मिळते आणि संगणाकावर ही माहिती पाहता देखील येते. तज्ञांच्या मते जर वाळूचे प्रमाण जमिनीत जास्त असेल तर अशा ठिकाणी पाणी चांगले असते व जमीन जर खडकाळ युक्त असेल तर पाणी ती शोषत नाही व भूजल साठा कमी असतो.
नैसर्गिक गोष्टींमुळे तुम्ही लावू शकतात जमिनीतील पाण्याचा अंदाज
जमिनीखालील पाणी शोधण्याचा इतरही काही पद्धती आहेत त्यात नैसर्गिक पद्धत देखील तज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात येते. नैसर्गिक पद्धतीमध्ये हायड्रोबायोलॉजीकल इंडिकेटर ही पद्धत देखील पाण्याचा शोध घेण्यासाठी फायद्याची ठरू शकते.यामध्ये जमिनीतील पाण्याचा खोलीचा अंदाज घेण्यासाठी झाडे आणि काही निसर्गातील निवडक कीटक यांचे निरीक्षण केले जाते.
नैसर्गिक पद्धतीमध्ये शास्त्रज्ञ कडुलिंब, ताडाचे झाड, नारळ आणि खजूर यासारख्या झाडांची वाढ व त्यांच्या वाढीची दिशा याचे निरीक्षण करतात. प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की झाडाच्या सर्व फांद्या कधीच वाकलेल्या नसतात. परंतु कधी कधी झाडाच्या फांद्या प्रमाणाबाहेर खाली वाकलेल्या दिसतात.
जरा अशा झाडाच्या फांद्या खाली वाकलेल्या असतील तर त्या ठिकाणी पाण्याची पातळी खूप जास्त प्रमाणात आहे असा अंदाज तज्ञांकडून लावला जातो. झाडांप्रमाणेच कीटक देखील जमिनीखालील पाणी शोधण्याच्या प्रक्रियेत उपयोगी जर का एखाद्या शेताच्या जमिनीत वाळवीचे प्रमाण जास्त असेल तर अशा ठिकाणी पाणी सापडण्याची शक्यता जास्त असते व एवढेच नाही तर अगदी कमीत कमी खोलीवर तुम्हाला पाणी मिळू शकते.