Search Name in Voter List: नवीन मतदार नोंदणी केली आहे का? असं बघा मतदार यादीतील तुमचं नाव.. ते सुध्दा फक्त दोन मिनिटांत…

Search Name in Voter List: भारत एक लोकशाही प्रधान देश आहे जिथे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. आताच निवडणुका पार पडल्या असल्या तरीही पुढील निवडणुकांसाठी, आणि आपल्या मतांचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणे अत्यावश्यक आहे. मात्र आता, मतदार यादीत तुमचे नाव आहे का, हे तपासण्यासाठी तुम्हाला कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता हे काम तुम्ही घरबसल्या ऑनलाईन करू शकता. या लेखामध्ये आपण सोप्या भाषेत, आणि उपयोगी पद्धतीने जाणून घेऊ की मतदार यादीतील आपले नाव कसे तपासायचे.

मित्रांनो, निवडणुका खूपच महत्त्वाच्या आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातून आपले सरकार कोणते असेल ते ठरवण्यात येते. आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. जर नाव नसेल तर तुम्ही मत देऊ शकणार नाही आणि हा तुमच्या लोकशाही हक्काचा अपमान ठरेल.

जर तुम्ही अलीकडेच मतदार नोंदणी केली असेल, किंवा तुम्हाला खात्री नाही की तुमचे नाव यादीत आहे का, तर चिंता करू नका! फक्त दोन मिनिटांत तुमचे नाव ऑनलाईन कसे तपासायचे, याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला आता पुढे सांगणार आहोत.

मतदार यादीत नाव तपासण्यासाठी आवश्यक माहिती | Check Your Name in Voter List

मतदार यादीत नाव तपासण्यासाठी खालील माहिती तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे:

  • EPIC क्रमांक: तुमच्या मतदार कार्डवरील Elector Photo Identification Number.
  • तुमचे पूर्ण नाव.
  • जन्मतारीख किंवा वय.
  • तुमचा जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ.

जर ही माहिती तुमच्याकडे नसेल तरही चिंता करू नका. मतदार यादीत नाव तपासण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. चला ते पाहूया.

मतदार यादीत नाव कसे तपासायचे? | How to Check Name in Voter List

मतदार यादीत नाव तपासण्यासाठी तीन सोपे पर्याय आहेत. तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता.

1) माहितीवरून नाव शोधा | Search by Details

आता आपण ही माहिती भरून नाव कसे शोधायचे ते जाणून घेऊ:

  • यासाठी सगळ्यात आधी गुगलवर “Voter Service Portal” सर्च करा किंवा थेट https://electoralsearch.eci.gov.in या लिंकवर क्लिक करा.
  • वेबसाईट उघडल्यानंतर “Search by Details” हा पर्याय निवडा.
  • तुमचे राज्य आणि भाषा निवडा.
  • तुमचे नाव, जन्मतारीख, वय, जिल्हा, आणि विधानसभा मतदार संघाची माहिती भरा.
  • कॅप्चा कोड टाका आणि Search बटणावर क्लिक करा.

काही क्षणांतच तुम्हाला तुमच्या नावाची सर्व माहिती दिसेल.

2) EPIC क्रमांकावरून शोधा | Search by EPIC Number

जर तुमच्याकडे EPIC क्रमांक असेल, तर हा पर्याय तुम्ही वापरू शकता:

  • यासाठी आधी “Search by EPIC” पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमचे राज्य निवडा.
  • तुमचा मतदार कार्डवरील EPIC क्रमांक भरा.
  • कॅप्चा कोड टाकून Search वर क्लिक करा.
  • काही सेकंदांत तुमचे नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

3) मोबाईल क्रमांकावरून शोधा | Search by Mobile Number

तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर वापरून नाव तपासण्यासाठी:

  • आधी “Search by Mobile” पर्याय निवडा.
  • राज्य आणि भाषा निवडून मोबाईल नंबर टाका.
  • Send OTP बटणावर क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला OTP टाका आणि Search करा.
  • तुम्हाला तुमचे नाव स्क्रीनवर बघायला मिळेल.

मतदार यादीत नाव नसेल तर काय कराल? | What to do if the name is not in the voter list?

जर तुम्हाला मतदार यादीत नाव दिसत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही त्वरित तुमच्या स्थानिक निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तसेच, ऑनलाईन नोंदणी करून तुमच्या नावाचा समावेश करून घेऊ शकता. नाव नोंदणीसाठी https://www.nvsp.in या वेबसाईटला भेट द्या.

मतदार यादीत नाव तपासण्याचे फायदे

  • मतदानाचा हक्क: नाव यादीत असल्याशिवाय मतदान करता येत नाही.
  • शासकीय लाभ: मतदार कार्ड हे ओळखपत्र म्हणून विविध शासकीय सेवांसाठी आवश्यक आहे.
  • निवडणूक प्रक्रियेतील सहभाग: आपल्या लोकशाही हक्काचा उपयोग करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे अत्यावश्यक आहे.

निवडणुका या आपल्या देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुमच्या एका मतामुळे मोठा बदल घडू शकतो. म्हणूनच तुमचे नाव मतदार यादीत आहे याची खात्री करा. आता तर हे काम अजूनच सोपे आणि डिजिटल झाले आहे.

मतदान हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि आपण तो बजावणे हे आपले कर्तव्य आहे. जर तुमचे नाव अजूनही मतदार यादीत नसेल, तर त्वरित नाव नोंदवा. आणि जर आहे, तर मतदानासाठी सज्ज व्हा. देशाच्या प्रगतीसाठी आणि चांगल्या भविष्यासाठी आपला हक्क बजावूया.

Search Name in Voter List याबाबतची ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल अशी आशा आहे. हा लेख इतरांसोबत शेअर करून त्यांनाही मतदार यादीतील त्यांचे नाव तपासण्यासाठी मदत करा.