
Saving Scheme with extra benefits पोस्ट ऑफिस विभाग हा भारतीय सरकारअंतर्गत काम करणारा शासकीय विभाग आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या बचत योजना राबवल्या जातात. तसेत या योजनांवर आकर्षक व्याजदर देखील दिला जातो. अशाच 10 सरकारी बचत योजना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पोस्ट ऑफिस विभागामार्फत कोणत्याही बचत योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरीकांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, राहण्याचा पुरावा हे कागदपत्र असणे अत्यंत आवश्यक असते.
मासिक उत्पन्न योजना (MIS) Monthly Income Scheme
मासिक उत्पन्न योजने अंतर्गत नागरीक दर महिना किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपये बचत करू शकतात. तसेच संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत सध्या 7.4 टक्के वार्षिक दराने व्याजाचा लाभ दिला जात आहे. मासिक उत्पन्न योजनेची मॅच्युरिटीचा म्हणजेच परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा असतो. सभासदाला योजना एक वर्षानंतर बंदही करता येते फक्त यावेळी व्याजासह जमा रकमेतील 2 टक्के कपात केली जाते. तसेच सभासदाला तीन वर्षांनी खाते बंद करायचे असल्यास 1 टक्के रक्कम कापली जाते.
नॅशनल टाइम डिपॉझिट स्कीम – National time deposit scheme
National time deposit scheme म्हणजेच नॅशनल टाइम डिपॉझिट स्कीम या योजनेला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट किंवा पोस्ट ऑफिस एफडी असे देखील म्हणतात. ही नागरिकांमधील अत्यंत लोकप्रिय योजना आहे. या योजनेमध्ये 7 % हून अधिक व्याज मिळते. परंतु एक वर्ष ते पाच वर्षांसाठी या योजनेअतंर्गत व्याजदर वेगवेगळे आहेत. एक वर्षासाठी 6.90%, 2 किंवा3 वर्षांसाठी ७% आणि 5 वर्षांसाठी 7.50% व्याजदर आहेत.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र National saving certificate
National saving certificate या योजनेला मराठीमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र असे म्हणतात. यामध्ये नागरीक ५ वर्षांसाठी पैसे जमा करु शकतात. योजनेत तुम्ही किमान 1000 ते कमाल 1 लाखापर्यंत रुपये गुंतवू शकता. यामध्ये मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा असतो. गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. सध्या या योजनेत वार्षिक 7.7 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेअतंर्गत आधी कागदी प्रमाणपत्र दिले जात असे परंतु आता ते बंद करण्यात याले असून, केवळ इलेक्ट्रॉनिक मोड मध्ये हे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र खरेदी करता येते. केवळ रक्कम ही 100रु. च्या पटीत हवी.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही पोस्ट ऑफिसअंतर्गत चालवण्यात येणारी केंद्रीय योजना आहे. खासकरून मुलींसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. योजनेंतर्गत गुंतवणुकीची किमान रक्कम 250 रु.व कमाल मर्यादा 1.5 लाख रु. आहे. मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा तिच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी पैसे काढून मॅच्युरिटीपूर्वी बंद केले जाऊ शकते. या योजनेचा परिपक्वता कालावधी 21 वर्षांचा आहे. यामध्ये आयकर कायदा 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ देखील उपलब्ध आहे. सध्या ही योजना वार्षिक आधारावर 8 टक्के दराने व्याजाचा लाभ देत आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना Public Provident Fund (PPF)
भारतीय नागरीकांना बचतीची सवय लागावी आणि खाजगी सुरक्षे अंतर्गत काम करणार्या नागरीकांना सेवानिवृत्ती नंतर आर्थिक सुरक्षा मिळावी म्हणून PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह योजने ची सुरुवात वित्त मंत्रालयाने 1968 मध्ये केली गेली. ही देखीव एक पोस्ट ऑफिस योजना असून या योजनेत किमान 500 रु. आणि कमाल 1,50,000 रुपये नागरीक गुंतवू शकतात. या योजनेअंतर्गत नागरीकांना कर्ज देखील घेता येते. या योजनेंतर्गत वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते. खात्यात मिळालेले व्याजावर आयटी कायद्याच्या कलम 10 नुसार करातून सुट मिळते. तसेच आयकर कायदा 80C अंतर्गत Public Provident Fund योजनेस कर कपातीचा लाभही उपलब्ध आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना National senior citizen savings scheme
National senior citizen savings scheme म्हणजेच ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही पोस्ट ऑफिस योजना असून वृद्ध व्यक्तींसाठी आहे. केवळ 60 वर्षे पूर्ण झालेली महिला किंवा पुरुषच या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये आपले खाते उघडू शकते. तसेच नोकरीतून 55 नी निवृत्त झालेली व्यक्ती देखील या योजनेअतंर्गत खाते उघडू शकते. योजनेत संयुक्त खाते देखील उघडता येते. 2023 नुसार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेस 8.20 टक्के दराने व्याज दिले जात आहे. वृद्धांना मिळणारे हे व्याज व्याज एप्रिल, जुलै, ऑक्टोबर, जानेवारीच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी जमा केले जाते. योजनेतील रकमवर आयकर कायद्याच्या कलम 80-सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो..
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही भारत सरकारच्या क्रेंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये जाहीर केलेली दोन वर्षांसाठीची बचत योजना आहे. या योजनेत 7.5 टक्के व्याज दिले जाते आणि ते दर तिमाहीत गुंतवणुकीत जोडले जाते. या योजनेअंतर्गत किमान गुंतवणूक रु. 1,000 आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा रु. 2 लाख आहे. 2 वर्षांच्या कालावधीसाठी महिला किंवा मुलींच्या नावे 2 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत ठेवता येतात.
आवर्ती ठेव योजना Recurring Deposit
आवर्ती ठेव योजना ही एक गुंतवणूकसह बचत पर्याय देणारी योजना असून पोस्ट ऑफिस आणि बँकांमार्फत देखील ही योजना चालविण्यात येते. या सरकारी योजनेत किमान 100 रुपये जमा करता येतात. रक्कम जमा करण्यासाठी कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. मॅच्युरिटीचा कालावधी 5 वर्षांचा आहे. 2023 मध्ये 5 वर्षांच्या आवर्ती ठेवीवर (RD) 6.5 टक्के व्याजदर आहे.
किसान विकास पत्र योजना
किसान विकास पत्र या योजनेचा केवळ शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. बचत केलेल्या रकमेवर शेतकऱ्याला वार्षिक ७.५ टक्के दराने व्याज मिळते. तसेच या योजनेअंतर्गत बचत केल्याचे शेतकऱ्याचे पैसे ११५ महिन्यांत म्हणजे ९ वर्षे आणि ७ महिन्यांत दुप्पट होतात. किसान विकास पत्र योजनेंतर्गत १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही प्रौढ व्यक्ती खाते उघडू शकतो. या योजनेत गुंतवणुक करण्याची किमान रक्कम १००० रुपये तर कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. फक्त ५० हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी शेतकऱ्याला त्याचे पॅनकार्ड जोडणे बंधनकारक आहे.
पोस्ट ऑफिस बचत योजना Post office saving scheme
पोस्ट ऑफिस बचत योजनेत किमान 500 रु. आणि जास्तीत जास्त कितीही पैसे जमा करता येतात. तसेच संयुक्त खाते देखील उघडता येते. आयकर कायद्यांतर्गत एका आर्थिक वर्षातील उत्पन्नातून वजावट म्हणून खात्यातील 10,000 रुपयांपर्यंतचे व्याज मिळू शकते. सध्या त्यावर 4 टक्के दराने व्याज मिळत आहे.