
ration card update भारतात सध्या डिजिटल क्रांतीने वेग घेतला आहे. त्यामुळे शासनाने सर्वच नागरी सुविधा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागू नयेत. त्यांचे काम कमी वेळाच आणि लवकर पुर्ण व्हावे यासाठी शासनाने शासकीय सेवा ऑलाईन करण्यावर भर देण्याचे ठरवले आहेत. त्याचेच फलीत म्हणजे रेशनकार्ड जे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो, आपल्या देशातील तब्बल 80 कोटीहून अधिक लोकसंख्या मोफत रेशनकार्डचा लाभ घेत आहेत. मोफत धान्य आणि सोयी सुविधांचा लाभ घेत आहेत. त्यांच्या सोयीसाठी आणि सर्वच भारतीयांना त्यांचे रेशनकार्ड हे ओखळ प्रमाणपत्र म्हणून देखील बरेचदा वापरावे लागते त्यांच्यासाठी देखील ही आनंदाची बातमी आहे की,
यापुढे आपल्याला नवीन रेशनकार्डसाठी, रेशनकार्डमधील नाव कमी करण्यासाठी, नाव वाढवण्यासाठी.किंवा इतर कोणतीही दुरुस्ती करण्यासाठी शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. यापुढे जर कोणाला रेशन कार्ड काढायचे असेल किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती करायचे असेल तर त्यांना ई रेशन कार्ड दिले जाणार आहे. कारण रेशनकार्ड आपल्याला Online Ration Card Maharashtra ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन प्राप्त करता येणार आहे. तसेच त्यात एखादी दुरुस्ती किंवा नाव कमी किंवा वाढवायचे असल्यास देखील ऑनलाईन अर्ज करुन रेशनकार्ड अपडेट करता येणार आहे. मग ही प्रोसेस नक्की कशी करायची ते पाहूया.
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज
- अर्ज कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती प्रमुख म्हणून तिच्या नावे अर्ज
- अर्जदार कुटुंबप्रमुखाचे दोन फोटो त्यावर अर्जदाराची सही
- आधार कार्ड
- नवीन शिधापत्रिका अर्जासोबत पूर्वीच्या शिधा पत्रकातील नाव कमी केल्याबाबतचा दाखला
- पत्त्याचा आणि जागेच्या पुराव्यासाठी स्वतःच्या घराचे विज बिल
- चालू वर्षाची उत्पन्नाचा दाखला.
- घर भाड्याने असल्यास, घर मालकाचे संमतीपत्र व त्याचे नावे असलेले वीज बिल किंवा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
दुसरे रेशन कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
तुमचे रेशन कार्ड हरवले असल्यास आणि तुम्हाला नवीन रेशन कार्ड हवे असल्यास ऑलाईन अर्ज करण्यासाठई आवश्यक ती कागदपत्रे खालील प्रमाणे
- रेशन कार्ड हरवल्याबाबत पोलीसांचा दाखला
- दुकानदारा कडील रेशन कार्ड चालू असल्याबाबतचा सही व शिक्का असणारा दाखला
- अर्जासोबत ओळखपत्र पुरावा
- कार्ड खुप जुने झाले असले व त्यावरील अक्षरे ही पुसट असतील, तर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र आवश्यक आहे.
- रेशन कार्ड जीर्ण झाले असेल, तर मूळ जीर्ण कार्डवर दुकानदाराची सही व शिक्का असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड मध्ये नाव वाढवायचे असल्यास आवश्यक कागदपत्रे
- लहान मुलांचे नाव वाढवण्यासाठी मुलांचे जन्माचे दाखले आणि शाळेतील बोनाफाईड दाखल्यांची साक्षांकित प्रत
- मोठ्या व्यक्तीचे नाव वाढवण्यासाठी पूर्वीच्या कार्डातून नाव कमी केले बाबतचा दाखला
- पत्नीचे नाव वाढवण्यासाठी माहेरच्या कार्डातून नाव कमी केल्याचा दाखला.
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र
ऑनलाईन पद्धतीने रेशनकार्डवरील नाव कमी करायचे असल्यास काय करावे?
- ना कमी करणे(नाव वगळणे) बाबत अर्ज
- परगावी राहण्यास जात असल्यास पहिले मूळ कार्ड आणि नाव कमी करण्याचा अर्ज
- मुलीचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका जोडून नाव कमी करण्याचा अर्ज भरावा.
- मयत असल्यास मयत दाखला
ऑनलाईन अर्ज भरल्यापासून रेशन कार्ड किती दिवसात मिळेल?
- नवीन रेशन कार्ड – १ महिन्याचा
- दुबार रेशन कार्ड – ८ दिवसांत
- नावामध्ये चूक असल्यास दुरुस्ती करणे – ८ दिवसात
- पत्ता बदलणे – ८ दिवसात
- नवीन नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे – ८ दिवसात
नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन Process-
- लिंक http://rems.mahafood.gov.in
- sign in बटण वर क्लिक करा
- public login हा पर्याय निवडा
- New User Sign Up Here या पर्यायावर क्लिक करा
- नवीन शिधापत्रिका साठी | Want to apply for New Ration Card” यावर क्लिक करा.
- Screen वर दिसणारी सर्व माहिती आधार कार्ड नुसार भरून आपले वयक्तिक user id व पासवर्ड तयार करा.
- Register User वर क्लिक करून आपले user id व पासवर्ड किंवा आधार नंबर टाकून लॉगिन करा.
- लॉगिन झाल्यावर Apply For New Ration card’ यावर क्लिक करून सर्व माहिती भरा. या टॅब वरून क्लिक करून माहिती भरा.
- Submit For Payment या पर्यायावर क्लिक करून शासन fee भरा. यांच्याकडून Verify झाल्यावर आपल्या लॉगिन ला शिधापत्रिका डाउनलोड साठी उपलब्ध होईल.
- जिल्हा, तालुका व गाव निवडा
- Add Member वर क्लिक करून प्रथम कुटुंब प्रमुखाची संपूर्ण माहिती भरा. माहिती आधार कार्ड नुसार भरावी.
- शिधापत्रिकेतील अजून मेंबर ऍड करायचे असल्यास परत Add Member पुढील टॅब मध्ये बॉक्स समोर माहिती विचारली आहे त्याप्रमाणे माहिती
- संपूर्ण फॉर्म भरल्यावर Submit करा.