PM Shri Yojana 2024: भारतातील 14,500 शाळा होणार मॉडर्न, शिक्षण होणार स्मार्ट

PM Shri Yojana 2024: भारतातील विद्यार्थ्यांनी आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त शिक्षण मिळावे आणि भारतातील शाळांचे आधुनिकिकरण व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम श्री योजना जाहीर केली आहे. ही योजना राज्या राज्यांमधील शाळा आणि तेथील शिक्षण अद्ययावर करण्यासाठी आखण्यात आलेली योजना आहे. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशात कोणत्या क्षमता विस्तृत करणारे शिक्षण दिले जाते यावर अवलंबून असतो. म्हणूनच ही योजना शिक्षण आणि विद्यार्थी यांनी केंद्रस्थानी ठेवून राबवण्यात येणार आहे. पीएम श्री योजनेबद्दल अधिक माहिती आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून मिळविणार आहोत. PM Shri Yojana 2024

काय आहे पीएम श्री योजना 2024?

या योजनेचे पूर्ण नाव प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया स्कीम म्हणजेच PM Schools for Rising India Scheme असे आहे. या योजनेच्या मदतीने शाळांना सक्षम केले जाणार आहे. खेळांच्या माध्यमातून अभ्यास आणि विविध विषयांवरील संशोधन  याला महत्त्व दिले जाणार आहे.  या आधुनिक शाळांमध्ये पायाभूत सुविधांवर भर देऊन डिजिटल वाचनालय, खेळ विभाग, आणि प्रयोगशिल शिक्षण यांचा समावेश असणार आहे. PM Shri Yojana 2024

PM Shri Yojana2024 साठी 27,360 कोटी रुपये मंजूर

 केंद्र शासनाकडून PM Shri Yojana 2024 या योजनेसाठी  27,360 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा सर्व निधी राज्या राज्यांमधील निवडण्यात आलेल्या शाळांच्या  नूतनीकरण आणि पुनर्रचनेसाठी खर्च करण्यात येणार आहे. राज्यांमधील स्थानिक शाळांना या योजनेचा खूप जास्त फायदा होणार आहे. PM Shri Yojana 2024

18 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा

 पीएम श्री योजना ही विद्यार्थीकेंद्री असून या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायादा व्हावा असा उद्देश आहे. म्हणूनच तर या योजनेचा फायदा 18 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना थेट होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-श्री योजने अंतर्गत  27,360 कोटी रुपये खर्चून पाच वर्षांमध्ये 14,500 शाळा अपग्रेड करण्याचा निर्णय मंजूर केला आहे. शाळा पर्यावरणपूरक करण्याचा निर्णय या अंतर्गत घेण्यात आला आहे. त्यानुसार शाळा ‘प्रदुषणरहीत आणि पर्यावरणपुरक’ केल्या जातील. PM Shri Yojana 2024

योजनेत शाळांनी सहभाग नोंदवावा

  • प्रधानमंत्री श्री योजना 2024 अंतर्गत ज्या शाळांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • https://dsel.education.gov.in/pm-shri-schools या लिंकवर क्लिक करुन शाळांनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • तेथे योजनेसंबंधी सर्व माहिती देण्यात आली आहे. PM Shri Yojana 2024

पीएम श्री योजनेंतर्गत महाराष्ट्रात 846 शाळा सुरू होणार.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र शासन प्रणीत प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया योजनेंची माहिती दिली.  या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील  846 शाळांची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य सरकार आणि फेडरल सरकारने करारनामा देखील केला आहे. पंतप्रधान श्री योजनेच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण भारतात 1500 हून अधिक शाळा स्थापन केल्या जातील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यासाठी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या योजनेत केंद्र सरकारचा 60 टक्के आर्थिक वाटा असणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक शाळेला 5 वर्षांसाठी 1 कोटी 88 लाख रुपये दिले जातील. म्हणजेच केंद्र सरकार या संस्थांना पाच वर्षांच्या कालावधीत 955 कोटी 98 लाख रुपये देईल, तर राज्य 40%  634 म्हणजेच  कोटी 50 लाख रुपये आर्थिक योगदान देणार आहे.  याचा अर्थ केंद्र सरकार प्रत्येक शाळेला पाच वर्षांच्या कालावधीत 75 लाख रुपये देणार आहे. पीएम श्री योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 408 गट, 28 महानगरपालिका आणि 383 नगरपालिका आणि नगर परिषदांमधून शाळा निवडल्या जातील. PM Shri Yojana 2024

Leave a Reply