
Increasing CIBIL score to get loan:- तुम्हाला कोणत्याही बँक किंवा इतर वित्तीय संस्थेकडून आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घ्यायचे असेल, तर सगळ्यात आधी बँकेकडून तुमचा CIBIL स्कोर कसा आहे ते तपासले जाते. समजा काही कारणाने तुमचा CIBIL स्कोअर घसरला असेल, तर तुम्हाला बँक किंवा इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळणे हे जरा कठीणच होते किंवा मग तुम्हाला कर्ज अजिबातच मिळत नाही.
आणि जरी कर्ज देण्यात येणार असेल तरीही त्यामागे आकारला जाणारा व्याजदर हा खूप जास्त असतो. त्यामुळे तुमचा CIBIL स्कोर चांगला ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. पण तुमचा CIBIL स्कोर कमी असेल तर तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. साधारणपणे, 550 ते 750 मधील CIBIL स्कोअर चांगला मानला जातो आणि तुम्हाला या CIBIL स्कोअरमध्ये सहज कर्ज मिळू शकते.
Increasing CIBIL score to get loan
परंतु जर तुमचा CIBIL 750 ते 900 च्या दरम्यान असेल तर तुम्हाला अतिशय वाजवी दर मिळतो आणि बँका सहज कर्ज देतात. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर चांगला ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुमचा CIBIL स्कोअर घसरत असेल तर तुम्ही काही टिप्स अवलंबून तुमचा CIBIL स्कोर नक्कीच चांगला करू शकता.
Increasing CIBIL score to get loan
1- घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्यात चुकू नका-
अनेक वेळा तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असेल तर ते वेळेवर फेडणे अत्यंत आवश्यक असते. तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यास, तुमच्या CIBIL स्कोअरवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी तुमच्या कर्जाचे हप्ते वेळेवर फेडणे फार महत्वाचे आहे. (Increasing CIBIL score to get loan)
2- कर्जाचे हप्ते भरण्यास उशीर करू नका-
जर तुम्ही घर किंवा कार हप्त्यांवर खरेदी केली असेल, तर तुमच्या कर्जाचे EMI वेळेवर परत करणे फार महत्वाचे आहे. अन्यथा त्याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होतो. तुम्ही ठराविक देय तारखेला EMI भरल्यास ते तुमचा CIBIL स्कोअर (Increasing CIBIL score to get loan) वाढवण्यास मदत करते.
3- CIBIL स्कोर वारंवार तपासा आणि चुका दिसल्यास त्या दुरुस्त करा (Increasing CIBIL score to get loan)-
तुमचा CIBIL रिपोर्ट तपासणे खूप महत्वाचे आहे. त्यात काही चूक आढळून आल्यास ती त्वरित दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा आपण कर्जाची परतफेड करतो पण कर्ज खाते बंद करायला विसरतो. याचा तुमच्या CIBIL स्कोअरवरही नकारात्मक परिणाम होतो. यासाठी तुम्हाला तुमच्या कर्जाची परतफेड केल्यानंतर कर्ज खाते बंद करणे आवश्यक आहे. (Increasing CIBIL score to get loan)
4- एखाद्याने कोणाच्या कर्जाचा गॅरेंटर किंवा जामीनदार होऊ नये-
कधीकधी आपण एखाद्याच्या कर्जासाठी गॅरेंटर देखील होत असतो. परंतु जर त्या व्यक्तीने कर्जाची वेळेवर परतफेड केली नाही, तर त्याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर 100% नकारात्मक परिणाम होतो. जरी त्या व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाही आणि तो डिफॉल्टर झाला तर त्याच्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर देखील झपाट्याने कमी होतो. या कारणास्तव, कधीकधी एखाद्याच्या कर्जासाठी जामीनदार बनणे टाळणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
5- क्रेडिट कार्ड मधून त्याच्या लिमिटपेक्षा फक्त 30 टक्के खर्च करा-
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्या कार्डवर दिलेल्या मर्यादेच्या फक्त 30% खर्च करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही 30 टक्क्यांहून अधिक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचा तुमच्या CIBIL वरही नकारात्मक परिणाम होतो.
तसेच, क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सायकलच्या आधी क्रेडिट कार्ड बिल भरणे आवश्यक आहे. तुमची क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरल्याने तुमचा CIBIL स्कोर लक्षणीयरीत्या सुधारू शकतो. Increasing CIBIL score to get loan