HDFC-Bank-Home-Lone-schemes-2024: HDFC Bank होम लोन कसे मिळवायचे?

प्रत्येकाचे स्वतःच्या घराबद्दल स्वप्न असते की आपले असे एक छान घर असावे. परंतु आता घराच्या किंमती गगनाला भीडत असताना सामान्य माणसांचे घराचे स्वप्न दिवसागणिक महाग होत आहे. अशावेळी एकमेव आधार असतो तो म्हणजे गृह कर्जाचा. त्यामध्ये एचडीएफसी बँकेचे होम लोन प्रक्रिया ही अत्यंत सहज आणि सोपी आहे. तसेच या बँकेची प्रोसेसिंग फी देखील कमी असल्याचे निदर्शनास येते. चला तर मग जाणून घेऊया की, HDFC बँकेकडून होम लोन मिळवायचे असेल तर अर्जदाराची पात्रता आणि गृहकर्ज प्रोसेसिंग फी किती आहे हे जाणून घेऊ.

HDFC बँक गृहकर्जाचे हे आहेत प्रकार

एचडीएफसी बँकेतून विविध प्रकारचे गृहकर्ज मिळते. बंगला, रो हाऊस किंवा खाजगी विकासकांकडून मंजूर प्रकल्पांमध्ये प्लॅटसाठी एचडीएफसी बँकेकडून गृहकर्ज मिळवता येते. HDFC-Bank-Home-Lone-schemes-2024

एचडीएफसी गृहकर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड ही ओळखपत्रे आवश्यक आहेत
  • मागील 3 वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न असणे आवश्यक आहे.
  •  बँकेतील बचत खात्याचे मागील 6 महिन्यांचे तपशील
  • पॅन कार्ड नसलेल्या अर्जदारांनी फॉर्म 60 भरुन देणे

एचडीएफसी होम लोनसाठी अर्ज कसा करावा

एचडीएफसी बँक होम लोनसाठी अर्जदार खालील चरणांमध्ये ऑनलाइन अर्ज करू शकतात:

  • एचडीएफसी बँकेच्या होम लोनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, https://www.hdfc.com/ या लिंकवर क्लिक करा.
  • गृहकर्जासाठी अर्ज करा वर क्लिक करा
  • पात्र गृहकर्जाची रक्कम शोधण्यासाठी ‘पात्रता तपासा’ वर क्लिक करा
  • ‘मूलभूत माहिती’ टॅब अंतर्गत गृह कर्जाचा प्रकार निवडा. अधिक माहितीसाठी, कर्जाच्या प्रकाराशेजारी असलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माहिती वाचून घ्या.
  • जर तुम्ही मालमत्तेची शॉर्टलिस्ट केली असेल आणि मालमत्तेचे तपशील भरा आणि  ‘होय’ पर्यायावर  क्लिक करा. मालमत्तेवर अद्याप निर्णय न झाल्यास, ‘नाही’ पर्यायावर क्लिक करा.
  •  ‘अर्जदाराचे नाव’ खाली तुमचे नाव टाका. गृहकर्जामध्ये सह-अर्जदार जोडायचे असल्यास सह-अर्जदारांची संख्या निवडा. तुम्ही गृहकर्जासाठी जास्तीत जास्त  जास्त 8 सहअर्जदार निवडू शकता.  
  • ‘अर्जदार’ पर्यायांतर्गत तुम्ही कुठे राहता ते ठिकाण निवडा. राज्य, तुम्ही राहत असलेले शहर, लिंग, अर्जदाराचे वय, व्यवसाय, मोबाइल क्रमांक, सेवानिवृत्तीचे वय, ईमेल आयडी, एकूण मासिक उत्पन्न ही सर्व माहिती भरा.
  • त्यानंतर पुढे गृहकर्ज अर्जाचा फॉर्म उघडतो जिथे तुम्ही आधीच दिलेले तपशील आधीच भरलेले असतात. उर्वरित तपशील  म्हणजेच पुढे जन्मतारीख आणि पासवर्ड भरा  आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • प्रक्रिया शुल्क भरा आणि तुमचा ऑनलाइन HDFC बँक होम लोन अर्ज पूर्ण झाला HDFC-Bank-Home-Lone-schemes-2024

अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारी बँक – HDFC बँक

आजपर्यंत अनेक भारतीयांचे घराचे स्वप्न  HDFC बँकेने पूर्ण केले आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांचा या बँकेने विश्वास संपादन केला आहे. कमी कागदपत्रांमध्ये झटपट गृहकर्ज मंजूर करून देणारी एचडीएफसी बँक प्रोसेसिंग फी देखील जास्त आकारत नसल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले आहे. तसेच ग्राहकांना EMI चा बोजा वाटू नये यासाठी देखील वेळोवेळी  या बँकेने विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. 7 जून 2024 पासून एचडीएफसी बँकेने  ग्राहकांसाठी काही नियम लागू केले असून बँकेचा MCLR 8.95% ते 9.35% टक्के दरम्याने आहे. एचडीएफसी बँकेने कर्जाच्या व्याजदरात बदल केला आहे. या बँकेने आपल्या marginal cost of lending rate मध्ये बदल केले आहे. ही या बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.  त्यामुळे गृहकर्ज व्याजदर कमी होणार असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. HDFC-Bank-Home-Lone-schemes-2024