Gai Gotha Yojana 2024: करा पशुपालन व्यवसाय आणि मिळवा बिनव्याजी कर्ज

Dairy Business Loan apply ग्रामिण भागातील नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना उत्पन्नाची साधने अगदीच मर्यादित असतात. त्यामुळे बरेचदा शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा सुशिक्षित तरुण बेरोजगारीमुळे आत्महत्या करताना दिसून येतात. ही ग्रामिण परिस्थिती बदलावी यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत बिनव्याजी कर्ज दिले जाते. हे कर्ज किती रकमेचे असते आणि कसे मिळवता येते ही सर्व माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.

किती रकमेचे बिनव्याजी कर्ज दिले जाते?

राज्यातील गरजू शेतकऱ्यांना शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुध व्यवसाय सुरु करता यावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत  1 लाख 60 हजाराचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. हे कर्ज शासकीय नामनिर्देशित बंकामार्फात उपलब्ध करुन दिले जाते. Dairy Business Loan apply

दुध व्यवसायिकांना मदत

शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करता यावा यासाठी शासनाच्या अनेक योजना कार्यरत आहेत. तसेच विविध शासकीय ग्रामिण विकास करणारी मंडळे देखील याबाबत काम करीत आहेत विविध योजना राबवत आहेत. त्यातील एक म्हणजे दुध व्यवसाय सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ काम करीत आहे. आणि या मंडळाच्या माध्यमातून 1.60 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दुध व्यवसायिकांना उपलब्ध करून दिले जाते. Dairy Business Loan apply

कोणत्या कामांसाठी मंडळाकडून बिनव्याजी कर्ज दिले जाते

ग्रामिण भागात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि तेथील तरुणांना चांगले उत्पन्न मिळावे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना राबवित आहे. या योजनेअतंर्गत 1 लाख 60 हजारांचे बिनव्याजी कर्ज मिळते. हे कर्ज शेतकरी किंवा दुध व्यवसायिक पुढील कारणांसाठी वापरु शकतात.  Dairy Business Loan apply

  • दुभत्या गायींसाठी गोठा बांधणे.
  • नवीन दुध देणाऱ्या जनावरांची खरेदी करणे.
  • दुध व्यवसाय सुरु करणे.
  • पशुपालन व्यवसाय सुरु करताना लागणाऱ्या इतर गोष्टी विकत घेणे.

गाय गोठा बिनव्याजी कर्जासाठीचा नमुना अर्ज

तुम्हाला देखील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या या गाय गोठा बिनव्याजी कर्जाचे लाभार्थी व्हायचे असेल तर आजच तुम्ही पुढील नमुना अर्ज भरून तुमच्या तलाठी कार्यालयात जमा करा. जोबत जी कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे जोडायची आहेत त्यांचे देखील नमुना अर्ज खालील लिंक मध्ये अंतर्भूत आहेत. Dairy Business Loan apply

https://drive.google.com/file/d/1UXYODmHP4n2sx1Va9Tz0w0puFqGFSFYt/view?pli=1

या योजनेचा लाभ घेण्यासाठी

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत दुध व्यवसायिकांना बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याशिवाय दुध व्यवसायिक  योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. Dairy Business Loan apply

  • एक वर्षापूर्वीच्या  म्हणजेच 12 महिन्यांच्या दुधाच्या पावत्या असणे आवश्यक आहे.
  • जर दुध व्यवसायिकाकडे 5 गाई असतील तर त्यांना अजून 5 गाई घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते
  • दुभत्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी कर्जाच्या रकमेचा वापर करता येतो

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रे आवश्यक असतात तशीच या योजनेसाठी देखील अर्ज करणाऱ्या अर्जदाराने पुढील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याशिवाय योजनेचा लाभ अर्जदाराला घेता येणार नाही. Dairy Business Loan apply

  • अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड
  • जमिनीचा 8 अ उतारा
  • जमिनीचा 7/12 उतारा (ज्या जमिनीवर गोठी बांधायचा आहे)
  • ग्रामपंचायत नमुना 9 प्रमाणपत्र
  • तहसिलदाराकडून मिळालेले रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • ग्रामसेवकांच्या सही व शिक्याचे शिफारस पत्र

अर्जदाराने ही सर्व कागदपत्रे आणि अर्जासोबत जोडल्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्या नुसार पोचपावती दिली जाते. आणि कर्ज मंजूर होते, कर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यात ते जमा केले जाते. Dairy Business Loan apply

Leave a Reply