Check Your Name In Voter List: निवडणुकीत सहभागी होणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे सगळ्यात महत्वाचे कर्तव्य आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुका या वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात होणार असून अशा परिस्थितीत सामान्य नागरिक मतदार यादीत त्यांचे नाव आहे की नाही हे कसे जाणून घेऊ शकतो, याबद्दल आता आपण या लेखातून जाणून घेऊया. लोकसभा 2024 च्या निवडणुका या वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात होणार असून, लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि अधिक मजबूत करण्यासाठी निवडणुका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि यासाठी निवडणुकीत सहभागी होणं हे देशातील प्रत्येक नागरिकाचे सगळ्यात महत्वाचे कर्तव्य आहे.
निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला आपल्या मतांद्वारे देशातील नेते आणि प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क मिळतो. देशाच्या भवितव्यामधे मतदाराचे महत्त्वाचे योगदान हे असतेच. देशातील लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोग महत्वाची भूमिका बजावते.
भारतातील तरुणांवर नेहमीच एक सामान्य आरोप लावला जातो की ते त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करत नाहीत. मात्र निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमांमुळे मतदानात तरुणांसह सर्वांचाच सहभाग वाढत आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिक मतदार यादीत (Check Your Name In Voter List) त्यांचे नाव आहे की नाही ते घरबसल्या कसे जाणून घेऊ शकतात हे आता आपण जाणून घेऊया.
मतदार ओळखपत्र म्हणजे काय?
निवडणुकीत मतदान करण्यासाठी लागणारे मतदार ओळखपत्र हे सर्वात आवश्यक कागदपत्र आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला एक अधिकृत मतदार ओळखपत्र जारी करण्यात येते. मतदानासाठी पात्र असलेले नागरिक निवडणूक आयोगाकडे अर्ज करून त्याच/तिच मतदार ओळखपत्र मिळवू शकतात.
मतदार यादीत आपले नाव कसे तपासायचे:
मतदानासाठी खऱ्या अर्थाने पात्र होण्यासाठी, तुम्हाला मतदार यादीतील तुमचे नाव तपासण्याची आवश्यकता असेल. आणि तुमचे नाव तुम्ही ऑनलाइन माध्यमातून देखील सहज तपासू शकणार आहात. तुमच्या सोयीसाठी, आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा अनेक पर्यायांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही मतदार यादीतील तुमचे नाव (Check Your Name In Voter List) सहज तपासू शकणार आहात.
राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलद्वारे मतदान यादीतील तुमचे नाव कसे तपासायचे:
स्टेप-1: यासाठी तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
स्टेप-2: त्यांनतर तुम्हाला Search In Electoral Roll या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप-3: पुढील पेजवर, पुढे देण्यात आलेल्या कोणत्याही एका पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही ते अगदी सहज तपासू शकता.
1. तुमच्या डिटेल्स च्या आधारे तुमचं नाव (Check Your Name In Voter List) शोधा.
2. तुमचे नाव EPIC क्रमांकानुसार शोधा.
एसएमएसद्वारे मतदान यादीतील तुमचे नाव कसे तपासायचे:
आता कोणताही मतदार एसएमएसद्वारे मतदार यादीतील आपले नाव पुढे दिलेल्या स्टेप्स चा वापर करून तपासू शकणार आहे.
स्टेप-1: यासाठी तुम्हाला मतदार ओळखपत्र नोंदणी करताना मिळालेला नोंदणी क्रमांक वापरावा लागणार आहे.
स्टेप-2: यांनतर तुम्हाला तुम्हाला EPIC (निवडणूक फोटो ओळखपत्र) क्रमांकाची गरज असणार आहे, आणि हा नंबर 10 अंकी असेल.
पायरी-3: तुमचा हा EPIC क्रमांक आम्ही पुढे दिलेल्या फॉरमॅटमध्ये, 1950 या नंबर वर तुम्हाला पाठवावा लागेल. Check Your Name In Voter List
एसएमएस पाठवण्याचा फॉरमॅट पुढीलप्रमाणे आहे. EPIC<space>मतदार आयडी क्रमांक
हेल्पलाइन नंबरद्वारे तुमचे नाव कसे तपासायचे:
मतदार यादीतील तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून याबद्दलची माहिती घेऊ शकता.
यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवरून 1950 डायल करावं लागेल.
त्यांनतर IVR (इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) अनुसार, तुमची पसंतीची भाषा निवडा आणि त्याद्वारे पुढे सांगण्यात येतील त्या स्टेप्स फॉलो करा.
यासोबतच तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर माहीत असावा लागेल आणि त्यानंतरच तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत शोधू शकता. Check Your Name In Voter List
मतदान कर्डासोबत यापैकी एक ओळखपत्र दाखवून तुम्ही तुमचे मत देऊ शकाल:
1. पासपोर्ट
2. ड्रायव्हिंग लायसन्स
3. तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असाल किंवा PSUs आणि Public Limited कंपनीमध्ये काम करत असाल तर, कंपनीच्या फोटो आयडीच्या मदतीने सुद्धा तुम्हाला मतदान करता येईल.
4. पॅन कार्ड
5. आधार कार्ड
6. पोस्ट ऑफिस आणि बँकेने जारी केलेले पासबुक.
7. मनरेगा जॉब कार्ड.
8. श्रम मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा कार्ड.
9. पेन्शन कार्ड ज्यावर तुमचा फोटो सुद्धा असेल.
10. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड.
11. खासदार/आमदार/एमएलसी यांनी जारी केलेले ऑफिशियल ओळखपत्र.
12. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालया द्वारे जारी करण्यात आलेले अपंगत्व ओळखपत्र (UDID) कार्ड. Check Your Name In Voter List