Cvigil APP: आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करा Cvigil ॲपवर, 100 मिनिटांतच केली जाईल कारवाई!

Cvigil APP: आदर्श आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी Cvigil ॲप लाँच केले आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार या ॲपच्या मदतीने काही मिनिटांतच करता येते आणि त्यावर केलेल्या कारवाईची माहिती देखील तुमच्यापर्यंत 100 मिनिटांतच पोहोचवली जाते. लोकसभा निवडणुकीच्या काळामधे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे तुमच्या निदर्शनास आल्यास, तुम्ही त्याबद्दल तुमच्या मोबाईलवरून सहज तक्रार करू शकता. Cvigil APP

आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, तुम्हाला सुरुवातीला तुमच्या Android मोबाइलमध्ये Cvigil ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही आचारसंहिता उल्लंघन झाल्याबाबत फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करून त्याद्वारे ऑनलाइन तक्रार करू शकता. या ॲप मधे सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे या ॲप मधे तक्रार करणाऱ्याची ओळख गुपित ठेवली जाते आणि आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई सुद्धा होते. आजच्या या लेखात आम्ही Cvigil ॲप कसे वापरायचे या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री नंबर आणि कंट्रोल रूम नंबर व्यतिरिक्त, सी-व्हिजिल ॲप देखील आता लाँच केले आहे, ज्यामध्ये तक्रार केल्यावर संबंधित अधिकारी तक्रारीवर पाठपुरावा करतील, आणि त्यांनतर त्यांना 100 मिनिटांच्या आतच कारवाई बद्दल तक्रारदारास कळवावे लागेल. या ॲपच्या वापराबाबत आता निवडणूक आयोग मतदारांना जागरूक करण्याचे काम करत आहे. या ॲपच्या मदतीने कोणताही सामान्य नागरिक कोणत्याही पक्षाने किंवा उमेदवाराने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्यास त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करू शकतो. सर्व Android स्मार्टफोनवर हे ॲप काम करते. Cvigil APP

जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण मिश्रा यांनी सांगितले आहे की, सी-व्हिजिल ॲप हे भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेले सोपे ॲप आहे. ते वापरण्यासाठी फोनमध्ये कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस असणे आवश्यक आहे. तक्रारदाराला आदर्श आचारसंहिता भंगाच्या घटनेच्या शॉर्ट डिस्क्रिप्शन म्हणजे थोडक्यात वर्णन करून एक व्हिडिओ बनवावा लागेल आणि तो ॲपमध्ये अपलोड करावा लागेल. यांनतर तक्रारदाराला त्याच्या मोबाईलवर एक युनिक आयडी देण्यात येईल आणि याचा वापर करून तो पुढील प्रोसेस चे अपडेट्स मिळवू शकेल. या ॲपवर तक्रार नोंदवताच, तक्रार संबंधित फील्ड युनिटकडे पाठवली जाईल आणि काही मिनिटांतच उड्डाण पथक त्या ठिकाणी पोहोचून योग्य ती कारवाई करेल.

पुढे या कारवाईशी संबंधित माहिती फील्ड युनिट, रिटर्निंग ऑफिसरला देईल. घटना खरी असल्याचे आढळल्यास, पुढील कारवाईसाठी ती भारतीय निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलकडे पाठवण्यात येईल. 2019 च्या निवडणुकीत सुद्धा या ॲपचा वापर करण्यात आला होता. प्रवीण मिश्रा म्हणाले की, कोणताही नागरिक सी-व्हिजिल ॲप चा वापर करू शकतो. आचारसंहिता लागू होताच हे ॲप पुन्हा लाँच करण्यात आले आहे.

अँड्रॉईड मोबाईलमध्येही Cvigil ॲप वापरता येणार | Cvigil APP for Android

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार अँड्रॉईड मोबाईलवर सुद्धा Cvigil ॲप सहज वापरता येणार आहे. पोटनिवडणूक, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग होत असेल तर या बद्दलची तक्रार करण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तक्रार करताना, हे ॲप ऑटो मोडमध्ये लोकेशन निवडते, ज्यामुळे तक्रारकर्त्याला आचारसंहिता ज्या ठिकाणी भंग झाली त्या ठिकाणाविषयी माहिती देण्याची आवश्यकता नाही.

Cvigil ॲप कसे काम करते? | How Cvigil APP works?

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, परंतु कोणतेही योग्य आणि ठोस पुरावे न आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करता आली नाही. आणि याच कारणाने आचारसंहिता भंगाच्या एक ना अनेक घटनांमध्ये वेळेवर कारवाई होऊ शकली नाही. परंतु आता मात्र आचारसंहिता भंगाचा फोटो किंवा 2 मिनिटांचा व्हिडिओ तुम्ही Cvigil ॲपच्या मदतीने तुम्ही तक्रार करताना अपलोड करू शकता. या ॲप वर अपलोड केलेले फोटो किंवा व्हिडीओ च्या मदतीने तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोग 100 मिनिटांतच कारवाई करेल.

जर तुम्हाला देखील Cvigil ॲपद्वारे आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार नोंदवायची असेल, तर उल्लंघनाचा फोटो किंवा 2 मिनिटांचा व्हिडिओ तयार करा आणि त्याचे थोडक्यात डिस्क्रीप्शन, म्हणजे काय चूक आहे याबद्दल थोडक्यात माहिती द्या. यानंतर, Cvigil ॲप उघडा आणि व्हिडिओ किंवा फोटोसह हे लिहा. या दरम्यान, लोकेशन मॅपिंग ऑटो मोडमध्ये केले जाईल आणि तुम्ही सबमिशन वर क्लिक करून तक्रार पोस्ट करू शकता. Cvigil APP

Leave a Reply