
Wrong E Challan Complaint तुम्ही चारचाकी किंवा दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला ई चालान म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊ. जर का तुम्हाला चुकीचे ई-चालान लागले आहे तर घाबरू नका ते कॅन्सल करण्याची एक पद्धत आहे. आजच्या आपल्या लेखाच्या माध्यमातून चूकीच्या पद्धतीने तुम्हाला ई-चालान लावले गेले असल्यास नेमके काय करावे याची संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा आणि तुमच्या बाबतीत असे काही झाले असल्यास आम्हाला कमेंट करुन जरुर कळवा. Wrong E Challan Complaint
ऑनलाइन ई-चलन म्हणजे काय?
रस्त्यांवर वाहन चालवताना नियमांचे पालन करावे लागते. हे नियम पाळले गेले नाही तर वाहन चालकाला त्याचा दंड भरावा लागतो. वाहतुकीचे उल्लंघन ही एक सामान्य दंडनीय घटना आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. परंतु अनेकजण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, त्यामुळे रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी पोलिस आणि वाहतूक व्यवस्थापन अधिकाऱ्यांना कडक नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी लागते. अशा वाहतुक नियमांना तोडणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या मोबाईलवरच दंड पाठवला जातो. यालाच ई- चालान असे म्हणतात. कारण सध्या डिजिटलायझेशनमुळे खूप प्रगती झाली आहे आणि ई-चालान या प्रकियेत तर खूपच मोठी क्रांती झाल्याचे आपल्याला दिसून येते. Wrong E Challan Complaint
वाहतुक नियमांचे उल्लंघन तपासण्यासाठी डिजिटल पद्धती
प्रत्येक शहराच्या महत्त्वाच्या सिग्नलला किंवा हायवेला सिसिटीव्हि कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. ज्यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकाच्या गाडीचा नंबर टिपला जातो आणि ई चालान पाठवले जाते. ई-चलान डिजिटल पद्धतीने वाहन मालकाच्या मोबाईल नंबरवर पाठवले जाते. ई-चालान पद्धतीमध्ये शासकीय वेबसाइट्स आणि ॲप्सच्या मदतीने दंडाचा आकारणीसंबंधीत तपासणी केली जाते. वाहन मालकाने दंड भरलेला नसेल तर त्याला तो दंड भरण्यास लावला जातो. Wrong E Challan Complaint
चुकीचे ई-चालान आल्यास काय करायचे?
वाहन मालकाला ई-चालान लागले असेल तर ते त्याला त्याच्या मोबाईल नंबरवर प्राप्त होते, आणि ऍपमध्ये पण कोणत्या कारणासाठी चालान लागले आहे ते देखील पाहू शकतो. आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाहतुकीचे नियम मोडलेले नसतील तरीही जर अन्यायकारकपणे तुमच्याकडून दंड आकारला जात असेल तर तुम्ही चुकीच्या ट्रॅफिक चालान विरोधात तक्रार दाखल करु शकता.
चुकीचे ई-चलन लढवण्यासाठी, वाहन मालक तक्रार करू शकतो आणि त्यांच्या निर्दोषतेचा पुरावा सादर करू शकतो. यामुळे ते वाहतूक पोलिसांशी संपर्क साधू शकतात आणि तक्रार प्रणालीद्वारे तक्रार नोंदवू शकतात. शिवाय, जर तुम्हाला ई-चालानमध्ये काही तांत्रिक समस्या आढळल्या, तर तुम्ही वाहन मालक म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊ शकता. हे खालील पद्धतीने केले जाऊ शकते: Wrong E Challan Complaint
- ईमेल पत्ता: [email protected]
- हेल्पलाइन क्रमांक: 0120-2459171 (सकाळी 6:00 ते रात्री 10:00 दरम्यान)
- वाहन मालकाच्या तक्रारीचा विचार करण्यासाठी आणि तुम्हाला परत अहवाल देण्यासाठी 15 दिवस लागू शकतात.
चुकीच्या ई-चलन विरुद्ध ऑनलाइन तक्रार कशी दाखल करावी
- चुकीची चालानाची तक्रार करण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करा.
- ई-चलानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – echallan.parivahan.gov.in
- ‘compliant’ या पर्यायावर क्लिक करा आणि तक्रार नोंदवा.
- तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि तुमचे नाव, संपर्क क्रमांक आणि चलन क्रमांक यासारखी माहिती भरा.
- ई-चलन तक्रारीचा पुरावा अपलोड करा
- अपलोडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा
- ई-चलन तक्रार सबमिट केल्यानंतर, वाहतूक पोलिस विभाग तक्रार प्रणालीद्वारे त्याचे पुनरावलोकन करेल आणि त्याच्या स्थितीबद्दल त्वरित अद्यतन प्रदान करेल.
चुकीच्या चालान विरोधात न्यायालयात दाद मागता येते
चुकीच्या पद्धतीने कापलेल्या चालानबद्दल तुम्ही न्यायालयात देखील दाद मागू शकता. कोर्टात कोणत्या कारणासाठी चालानबद्दल चॅलेंज करत आहात ते सांगावं लागेल. कोर्टात याबाबत संपूर्ण माहिती द्यावी लागेल. त्यावेळी तुम्ही कोणतीही चूक केली नाही, कोणत्या ठिकाणी होतात अशी सर्व माहिती सांगावी लागेल. तुम्ही सांगितलेली माहिती आणि पुरावे तपासून चुकीचं चालान कापलं गेल्याची बाब कोर्टाने मान्य केल्यास तुम्हाला लागलेले चालान रद्द केलं जाईल आणि पैसे भरण्याची गरज लागणार नाही. Wrong E Challan Complaint