
Goat Farming Loan Apply 2024 ग्रामिण भागात शेतीला पुरक व्यवसाय निर्माण व्हावा आणि शेतकऱ्यांना चांगला रोजगार मिळावा या हेतूने शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे शेळी पालन अनुदान योजना 2024. या योजनेअंतर्गत शेळी व बोकड पालनाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी लाभार्थ्याला 10 ते 50 लाखापर्यंतचे अनुदान शासनाच्या मार्फत देण्यात येणार आहे. या लेखाच्या माध्यमातून आज आम्ही शेळी पालन अनुदान योजने2024 संदर्भात संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूया ही योजना काय आहे. Goat Farming Loan Apply 2024
शेळी पालन अनुदान योजना 2024 – Goat Farming Loan Apply 2024
केंद्रसरकारने 2021-2022 या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला मंजुरी दिली. त्यानंतर 27 डिसेंबर 2021 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकार शेळी, मेंढी, कुक्कुट पालन व्यावसाय करण्यासाठी 10 ते 50 लाख रुपये अनुदान देणार आहे. या अंतर्गत लाभार्थ्याला 500 शेळ्या 25 बोकड पालन करण्यासाठी तब्बल 50 लाख रु. अनुदान महाराष्ट्र शासनातर्फे मंजूर करण्यात आले आहे. चला तर मग बघूया नेमके कोणकोणते प्राण्यांचे गट या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. आणि कोणकोणत्या प्राण्यांचे पालन करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. Goat Farming Loan Apply 2024
- 100 शेळी 05 बोकड
- 200 शेळी 10 बोकड
- 300 शेळी 15 बोकड
- 400 शेळी 20बोकड
- 500 शेळी 25 बोकड
योजनेसंबंधीत अधिकृत वेबसाईट
https://nlm.udyamimitra.in/Login/Login या लिंकवर क्लिक करुन तुम्ही पशुपालन आणि डेअरी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता. तेथे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अनुदान योजनेसाठी अर्ज करु शकता. आणि योजनेचे लाभार्थी बनू शकता. योजनेचे लाभार्थी बनण्यासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात ते आपण पुढे पाहू. तसेच नाबार्ड मार्फत देखील शेळी पालनासाठी अनुदान देण्यात येते त्यासंबंधीत लिंक देखील खाली देण्यात आली आहे. Goat Farming Loan Apply 2024
शेळी पालन अनुदान योजनेसाठी येथे अर्ज करा
https://www.nabard.org/content.aspx?id=548
शेळी पालन योजना 2024 अनुदान मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता?
- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराचे किमान शिक्षण 12वी पूर्ण असावे.
- अर्जदाराने शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतलेले असावे किंवा किमान 1 वर्षाचा शेळीपालनाचा अनुभव असावा.
- अर्जदाराकडे शेळी पालना प्रकल्पासाठी शेड उभारण्यासाठी स्वतःची जमीन किंवा भाडेतत्त्वावर जमीन असणे आवश्यक आहे.
- शेळी पालन प्रकल्पाकडे पाण्याचा स्त्रोत असावा.
- KYC साठी आर्जदारकडे सर्व संबंधित कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
शेळी पालन योजना 2024 अनुदान मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
शेळी पालन अनुदान योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड
- अर्जदाराच्या बँकेचा कॅन्सल चेक
- अर्जदाराचा रहिवासी पुरावा
- प्रकल्प अहवाल
- अनुभव प्रमाणपत्र
- आयकर भरल्याचे प्रमाणपत्र
- ज्या ठिकाणी प्रकल्प करायचा आहे त्या जमिनीचा नकाशा आणि जमिनीसंबंधीत इतर कागदपत्रे
- शेळी पालनाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र Goat Farming Loan Apply 2024
शेळी पालन योजनेची प्रमुख वैशिष्टे
- ग्रामिण भागात शेळीपालन, कुक्कटपालन व्यवसायाला चलना देणे.
- शेळी, मेंढी, कुक्कुटपालन आणि डुक्कर पालन या क्षेत्रामध्ये तरुणांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करणे
- शेतीला पुरक असणारे पशू उत्पादन वाढवणे
- अंडी, लोकर, शेळीचे दूध इत्यादी उत्पादनात जास्तीत जास्त प्रमाणात वाढ घडवून आणणे.
- चारा प्रक्रियेला प्रोत्साहन देणे.
- शेतकऱ्यांसाठी पशुधन प्रकल्पाला प्रोत्सहान देणे.
- कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देणे
- ग्रामिण भागात शेती सोबतच पुरक रोजगार निर्मिती करणे
- ग्रामिण तरुणांना व्यवसायासाठी प्रवृत्त करणे. Goat Farming Loan Apply 2024
- शेळीपालन, कुक्कुट पालन. मेंढी पालन या व्यवसायांतून जास्ती जास्त नफा कमावता येतो या गोष्टी ग्रामिण शेतकऱ्यांना फलदायी ठरतात.