स्वयंपाक घरात लागणाऱ्या LPG सिलिंडरची एक्स्पायरी डेट कशी ओळखायची? सिलिंडर घेताना फसवणूक होऊ नये म्हणून नक्की जाणून घ्या!

LPG सिलिंडर हा आपल्या दैनंदिन जीवनतील अत्यंत आवश्यक घटक आहे. कारण LPG सिलिंडर शिवाय जेवण बनूच शकत नाही. प्रत्येक घराघरात असो किंवा हॉटोल्समध्ये जिथे जिथे जेवण बनवले जाते तिथे तिथे लागणाऱ्या या  LPG सिलिंडर वरून अनेकदा आपण राजकारण देखील होताना पाहिले आहे. पण तुम्हाला या LPG सिलिंडर बद्दल एक महत्त्वाची गोष्ट माहित आहे का, की या सिलिंडरला सुद्धा एक्स्पायरी डेट असते.

आज या लेखाच्या माध्यमातून आपण ही एक्स्पायरी डेट कशी ओळखायची हे शिकणार आहोत.  कारण हा LPG सिलिंडर अत्यंत काळजीपुर्वक वापरावा लागतो. तसेच LPG सिलिंडर नेमके लाल रंगाचेच का असतात? या मागचे शास्त्रीय कारण देखील आपण जाणून घेणार आहोत. तरीच तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि घराघरात वापरल्या जाणाऱ्या या गोष्टी संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

कशी शोधायची LPG सिलिंडर वरील एक्स्पायरी डेट?

तुम्ही जेवण बनवण्यासाठी  जो गॅस सिलेंडर वापरता त्यावर असलेल्या तीन पट्ट्यांवर A-23, B-24 किंवा C-25 असे नंबर लिहिलेलं असतात हे नंबरच तुम्हाला गॅस सिलेंडरच्या एक्सपायरी डेटबाबत सांगतात. LPG सिलिंडर वरती जो नंबर असतो त्यात ABCD नुसार वर्षभरातील 12 महिने तीन तीन नुसार विभागलेले असतात. आपण पुढे पाहू कसे विभागलेले असतात हे बारा महिने. 

A या अल्फाबेटमध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे तीन महिने येतात.

B या अल्फाबेटमध्ये एप्रिल, मे, जून हे तीन महिने येतात.

C या अल्फाबेटमध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे तीन महिने येतात.

D या अल्फाबेटमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तीन महिने येतात.

तुम्ही पाहू शकता की तुमच्या LPG सिलिंडरवर D-20 किंवा C-22 असे आकडे असतात. हे आकडे असे दर्शवतात की वरती पाहिल्या प्रमाणे ABCD या पैकी कोणताही अल्फाबेट असेल तर त्या त्या अक्षराच्या गटातील महिना असतो आणि 23 किंवा 22 असे असेल तर ते वर्ष असते. म्हणजे एक उदारहरणा दाखल आपण पाहू शकतो की, तुमच्या घरात आलेल्या LPG सिलिंडरवर C-23 असे लिहिलेले आहे, तर तुमच्या घरातील सिलिंडर वर लिहिलेली ही तारीख म्हणजे टेस्टिंगची तारीख असते.  

LPG सिलिंडरवर एक्स्पायरी डेट लिहिली जाते कारण…

तुमच्या घरातील LPG गॅस सिलेंडरवर लिहिलेली तारीख ही टेस्टिंगची तारीख असते.  याचा अर्थ असा  होतो की, या तारखेला सिलिंडरची टेस्टिंग केलेली आहे. म्हणजे तो सिलिंडर पुढील वापरासाठी  पाठवण्या योग्य आहे की नाही हे त्यावरुनच ठरवलं जातं.  सिलिंडर तपासताना त्यामध्ये असणाऱ्या गॅसची हायड्रो टेस्ट केली जाते. तसेच ५ पट जास्त दाब देऊनही सिलिंडर मधील LPG गॅसची तपासणी केली जाते. आणि या चाचणी मध्ये फेल होणारे LPG सिलिंडर कायमस्वरुपी नष्ट केले जातात. LPG cylinder expiry date

LPG गॅस सिलिंडरचे आयुष्य किती असते?

तुम्ही घरा घरात जे LPG गॅस सिलिंडर वापरता त्याचे आयुष्य हे 15 वर्षे असते. या दरम्यान सिलिंडर दोनदा चाचणीसाठी पाठवला जातो. LPG सिलिंडरची पहिली चाचणी १० वर्षांनी आणि दुसरी चाचणी ५ वर्षांनी केली जाते. LPG cylinder expiry date

लाल रंगाचाच का असतो LPG सिलिंडर?

LPG Cylinder in Red Colour घराघरात वापरले जाणारे हे LPG सिलिंडर लाल रंगाचेच असतात हे अपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. एलपीजी गॅस हा अत्यंत ज्वलनशील गॅस आहे. गॅसला लगेच आग लागण्याची शक्यता असते म्हणूनच LPG सिलिंडर हा धोकादायक असतो. लाल रंग हा धोक्याचा रंग आहे. सिलिंडरला हा रंग देण्यामागे असा हेतू आहे की नागरिकांनी सिलिंडर हाताळताना काळजी घ्यावी. जागृकता बाळगावी. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना चेतावनी देण्यासाठी LPG सिलिंडरला लाल रंग देण्यात येतो.

Leave a Reply