
Solar Rooftop Online Application लोडशेडींगमुळे ग्रामिण भागात लाईट बंद ठेवली जाते. या सततच्या त्रासापासून ग्रामिण जनतेला मुक्ती मिळावी यासाठी केंद्रसरकार व महाराष्ट्र सरकारने संयुक्तरित्या सौरऊर्जा योजना(Solar Roof Top Scheme) सुरु केली आहे. ज्या ठिकाणी अजूनही वीज पोहोचवली जात नाही(आदीवासी पाडे) किंवा ज्याठिकाणी वारंवार वीज जाते अशा ठिकाणी सरकारने सोलर पॅनल बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
Solar Roof Top Scheme या योजनेमुळे ग्रामिण भागातील तळागाळापर्यंत वीज पोहोचणार आहे. या योजनेचा लाभ प्रत्येकाला व्हावा म्हणून शासनाने अनुदान जाहीर केले आहे. घरावर बसविण्याच्या सोलार पॅनलवर 80% इतके अनुदान शासनातर्फे देण्यात येणार आहे.
1 किलोवॅटसाठी लागणारी रक्कम – 46,000 रु
3 किलोवॅटसाठी लागणारी रक्कम – 1,38,000रु.
केंद्र शासनाकडून 40% अनुदान आणि राज्य शासनाकडून 40% अनुदान असे एकत्रीत रित्या 80% अनुदान तुम्ही मिळवू शकता.
Solar Roof Top Scheme संबंधीत शासकीय अनुदान मिळविण्यासाठी Solar Rooftop Online Application म्हणजेच सौरऊर्जा योजनेसाठीचा अर्ज दाखल करण्याची योग्य प्रक्रिया आपण जाणून घेऊ.
Solar Roof Top Scheme या योजनेसाठी आवश्यक बाबी
- अर्जदाराचे आधारकार्ड
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- आर्जदाराचे चालू विजबिल
- बँक पासबूक, बँकेचा कॅन्सल चेक
- उत्पन्नाचा दाखला
- घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे
- 15 वर्षे वास्तव्याचा पुरावा
Solar Rooftop Online Application करण्याची प्रक्रिया
- Solar Roof Top Scheme च्या या https://solarrooftop.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जा.
- Register Here या बटणावर क्लिक करा
- राज्य त्यानंतर तुम्ही सध्या वापर करीत असलेल्या विज पुरवठा करणाऱ्या कंपनीची निवड करा आणि तुमच्या सध्याच्या बिलावरील ग्राहक क्रमांक भरा
- Next बटनवर क्लिक केल्यावर तुमचा मोबाईल नंबर टाका, तुम्हाला ओटीपी येईल तो तिथे सबमीट करा.
- तुमचा ईमेलआयडी भरा
- आणि Submit बटनावर क्लिक करा.
तुमच्या अकाऊंटचे रजिस्ट्रेशन झाले
- त्यानंतर परत लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक द्यावा लागेल.
- पुढील प्रक्रिया विचारल्यानुसार करा, आवश्यक जागी कागदपत्रे, फोटो जोडा
- त्यानंतर प्राथमिक मान्यतेसाठी प्रतीक्षा करा. मान्यता मिळाल्यानंतर सोलार पॅनल उपलब्ध असलेल्या विक्रेत्याकडून बसवून घ्या.
- सोलार पॅनल बसविल्यानंतर Solar Planrची माहिती व प्रस्ताव Discom कडे Net Meterसाठी सादर करा.
- नेट मीटर बसविल्यानंतर Discom कडून तपालण्यात येईल व कमिशन सर्टिफिकेट पोर्टलच्या माध्यमातून Generate करण्यात येईल.
- Commissioning Report मिळाल्यानंतर बँक अकाउंट नंबर आणि कॅन्सल चेक पोर्टलवर अपलोड करा.
- पुढील ३० दिवसांमध्ये अर्जदाराच्या बँक खात्यावर Solar Roof Top Scheme ची Subsidy म्हणजेच अनुदान जमा होईल.
Solar Roof Top Scheme योजनेअंतर्गत लाभार्थ्याला सुरुवातीला करावे लागणाऱ्या खर्चाचे विवरण
- पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रूफटॉप सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी
- 1 किलो वॅट पावर सिस्टिममागे – 46,820 रु.खर्च
- 1 ते 2 किलो वॅट पावर सिस्टिममागे – 42,470 रु.खर्च
- 2 ते 3 किलो वॅट पावर सिस्टिममागे – 41,380 रु.खर्च
- 3 ते 10 किलो वॅट पावर सिस्टिममागे – 40,290 रु.खर्च
- 10 ते 100 किलो वॅट पावर सिस्टिममागे 37,020 रु.खर्च
- वरील आकडे आणि खर्च समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. वर नमूद केलेल्या या दराप्रमाणे 3 किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची 1 लाख 24 हजार 140 रुपये किंमत राहील. त्यामध्ये 40 टक्के अनुदान लागू झाल्यास 49 हजार 656 रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल व संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात 74 हजार 484 रुपयांचा खर्च करावा लागेल.
Solar Roof Top Scheme योजनेची वैशिष्ट्ये
- गृहनिर्माण संस्थांना Solar Roof Top Scheme योजनेअंतर्गत 20%अनुदान देण्यात येणार आहे.
- या योजनेमुळे महिनाकाठी भराव्या लागणाऱ्या वीज बिलात मोठी बचत होणार आहे.
- सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलो वॉट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीज दरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल.
या योजनेअंतर्गत गाव, पाडा, वस्ती किंवा अतिदुर्गम भागातील नागरिक विजेचा वापर करु शकतील.