
Solar Mobile Charger सौरऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सूर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. वाढती लोकसंख्या पाहता पुढच्या काहीच काळात ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत अनेक पटीत वाढेल. त्यासाठी सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुर्ण होण्यासारखी नाही. शिवाय जपानमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जगानेही अणुप्रकल्पांचा फेरविचार करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली ऊर्जेची गरज भागू शकेल.
सध्या बाजारात सौरऊर्जेवर चालणारी अनेक उपकरणांणे बाजारात दिसून येतात. अगदी सोलार वॉटर हिटर पासून ते संपूर्ण घराला वीज पुरवठा करणारे सोलार पॅनल पर्यंत अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत. तसेच कृषी पंप देखील सौर ऊर्जेवर चालविण्याचे यंत्र बाजारात उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मग मोबाईल जी आत्ता सर्वांचीच मुलभूत गरज समजली जाते ते मोबाईल चार्ज करणारे चार्जर सौर ऊर्जेवर का नसावे. मोबाईल तर अत्यंत महत्वाची आणि निकडीची गोष्ट आहे. म्हणूनच आपल्या सौरऊर्जा अभियंत्यांनी Solar Mobile Chargerचा शोध लावला. ज्यामुळे सौर ऊर्जेच्या मदतीने कोणत्याही प्रकारची अतिरिकत खर्च न करता मोबाईल चार्ज करणे सोपे झाले आहे.
Solar Mobile Charger होणारे फायदे आपण यापुढे पाहणार आहोत.
Solar Mobile Charger मुळे अभ्यासातील अडथळा संपला
आज सगळ्याच गोष्टी मोबाईलवर अवलंबून आहेत. बरेचसे विद्यार्थी मोबाईलवरच अभ्यास करताना दिसून येतात. परंतु आजही भारताच्या बऱ्याच खेडेगावात वीज पोहोचलेली नाही. अशा ठिकाणी मुलांना मोबाईलवर अभ्यास करणे अवघड होते. त्यामुळे सौर ऊर्जेवर चालणारे मोबाईल चार्जर Solar Mobile Charger बाजारात आले आहेत. त्यांचा वापर करुन मोबाईल पुन्हा चार्ज केला जाऊ शकतो. आणि मोबाईलच्या वापराने अभ्यास किंवा कोर्सेस शिकले जाऊ शकतात.
प्रवासात मोबाईल रिचार्ज करणे झाले सोपे
हल्ली अनेकजण रेल्वे किंवा रस्त्यामार्के 4 ते 5 दिवसांचा प्रवास करणे पसंत करतात. हल्लीच्या तरुणाईचा पाई भारतभ्रमण करण्यासारखी ध्येये पूर्ण करण्याकडे जास्त कल दिसून येतो. या तरुणांकडे घरच्यांसोबत कनेक्टिव्हीटीसाठी मोबाईल हे एकमेव साधन असते, तसेच प्रवासात व्हिडिओ किंवा रिल्स तयार करुन सोशल मिडियावर पोस्ट करणे आणि त्यातून फॉलोअर्स वाढवणे याकडे या तरुणांचा जास्त कल असतो. त्यांना प्रत्येक ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे चार्जर घेऊन प्रवास करणे सोईचे होते. आणि ते खिशाला देखील परवडणारे असते. म्हणूनच प्रवासात अत्यंत उपयोगी असे हे Solar Mobile Charger उपकरण आहे. सुर्याची ऊर्जा किंवा प्रकाश तर सगळीकडेच असतो. प्रवासासाठी निघालेली व्यक्ती कुठेही थांबून किंवा पायी चालताना देखील हे उपकरण कार्यरत राहू शकते. त्यासाठी काही वेगळी तजवीज करण्याची गरज नसत.
भारत हा सौरऊर्जेच्या उपकरणांचा मोठा खरेदीदार आहे
भारतात अक्षय ऊर्जेसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून सध्या सौर ऊर्जेत मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. सौर ऊर्जेचे मोठे प्रकल्प काही प्रमाणात यशस्वी होत असतानाच. घरगुती वापरासाठी किंवा छोटय़ा स्तरावरील वापरासाठीही सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोबाइल पॉवर बँक्स बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. यापैकी ईटी-स्टोन पॉवर बँक नुकतीच बाजारात आली आहे.
ज्यामुळे मोबाईल चार्ज करणे अत्यंत सोपे आणि कमी खर्चाचे होत आहे. अनेक तरुण या Solar Mobile Charger च्या वापराने खूश असल्याचे दिसून येते.
सोलार मोबाईल चार्जरची बाजारातील किंमत
सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलार मोबाईल चार्जर Solar Mobile Charger अनेकांच्या पसंतीस पडत आहेत. कारण कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च न करता मोबाईल चार्ज करुन मिळत आहेत. सध्याच्या बाजारातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोबाईल चार्जरची किंमत अगदी 299/- ते 1,000/- रुपयांच्या दरम्याने आहे.
तसेच ऍमेझॉनवर जाऊन तुम्ही सौर उर्जेवर चालणाऱ्या मोबाईल चार्जरची खरेदी करु शकता आणि इतरही सौरऊर्जेवर चालणारी चार्जिंगसंबंधी उपकरणे पाहू शकता. अलिकडच्या वर्षांत चार्जिंगचे साधन म्हणून यूएसबी पोर्ट अधिक प्रमाणात प्रचलित झाल्यामुळे, यूएसबी कनेक्शनसह अधिक सौर पॅनेल मार्केटमध्ये आले आहेत.